#SanjayRaut #NiteshRane #NarayanRane #Shivsena #BJP #MaharashtraTimes
शिवसेना खासदार आज नाशिक दौऱ्यावर होते. सिंधुदुर्ग न्यायालयात नितेश यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडत होती. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांने लपवले असेल तर…असे सूचक विधानही त्यांनी नितेश यांचे नाव न घेता केले. मात्र, यावर जास्त विचारणा केली असता, मी आताचं बोलत नाहीय. काही सांगता येत नाही ना, म्हणत त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेणे टाळले. राजकीय सुडापोटी आमच्यावर कारवाया केल्या. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.